मन वढाय वढाय
फोनची रिंग वाजली. तिने फाईल वरून नजर हटवित," यावेळेस कुणाचा फोन?" म्हणत फोनच्या स्क्रीन कडे एक नजर टाकली. "अहो" calling...." यावेळेस मनीष चा फोन!" तिला आश्चर्य वाटले. "आज तर याची मिटींग होती ना! वेळ झाला, उशिर होईल म्हणून टिफिन देखील नेला नव्हता. सकाळी लवकर ची ट्रेन पकडायची होती म्हणून लवकरच घराबाहेर पडला. आज बोलणेही झाले नाही आमचे! म्हणून तर नसेल ना केला फोन??" मृणालच्या मनाच्या कॅनव्हासवर सेकंदात, झरझर विचार उमटले. गाडीला ट्रॅक बदलायला जेवढ्या सेकंदाचा अवधी लागतो, तेवढ्या सेकंदभर क्षणात विचारांचे तरंग मनात उठतात. विचारांना काही थांगपत्ताच नसतो. एका मागोमाग एक विचार पिच्छा पुरवतात आणि मग पुरती दमछाक होते. या विचारांना थोपवून परत पूर्व मनस्थितीत येईपर्यंत विचारांनी घोळ केलेला असतो आणि पहिल्या विचाराशी शेवटच्या विचाराशी काही मेळ लागत नाही. शेवटी शून्य अवस्थेत ती शेवटच्या विचाराला थोपवते. हे मृणालचे अतिविचारी आणि भावनाशील मन तिलाच मानसिकरित्या थकवते. तिने विचारांची शृंखला थांबवित फोन रिसीव्ह केला. " हॅलो मृणाल, लं...