मनमानसी

मनच ते माझं!

सतत बोलत असतं. स्वगतच जणू!

अखंड अविरत‌.

कोणाचे लिखित शब्द, मौखिक बोल मग कानापर्यंत त्यावेळी पोहोचतच नाही. मनाचाच मनाशी एकतर्फी संवाद चालला असतो. डोळे फक्त भावरहित बघत असतात, तटस्थ होऊन. 

नदीचा अखंड प्रवाह फक्त बघत राहायचा. पात्रात पाय रोवून उभे असतानाही पायाचा विळखा सोडवून घेत, पाण्याने जसे आपल्याच तालात पुढे पुढे प्रवाही राहायचे... तसा हा मनाचा प्रवाह....

मनाचा संवाद मीच साधलेला!

मनमानसी!

_वीणा विजय

 

Comments